sharad Pawar
sharad Pawar Team Lokshahi

शरद पवारांना भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, त्यानंतर जनसमुदायाचा एकच जल्लोष

शरद पवार भाषण करत असताना त्यांच्याकडे प्रेक्षकातून एक चिठ्ठी आली. ती चिठ्ठी पवारांनी वाचली. गद्दारांचं काय असा प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आला होता. त्यानंतर पवारांनी "गद्दारांना पाडा, पाडा, पाडा." असं आवाहन केलं.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. रविवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्यामुळे नेमकं प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसात शनिवार-रविवार आल्याने वेगवेगळ्या पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी शरद पवार साताऱ्यातील वाईमध्ये होते. जाहीरसभेत भाषण करताना शरद पवारांना एक चिठ्ठी आली आणि त्यानंतर जनसमुदायाने एकच जल्लोष केला.

साताऱ्याच्या वाईमधील सभेमध्ये उपस्थितांनी शरद पवारांना एक चिठ्ठी दिली. त्यात पवारांनी गद्दारांना पाडा असं आवाहन करण्याची विनंती केली होती. यावेळी चिठ्ठी घेतल्यानंतर शरद पवारांनी उपस्थित जनसमुदायाला तीन वेळा गद्दारांना पाडा पाडा पाडा असे आवाहन केल्यानंतर उपस्थित जनसमुदायाचा एकच जल्लोष समोर दिसून आला.

थोडक्यात

  • साताऱ्याच्या वाईमधील सभेमध्ये उपस्थितांनी शरद पवारांना मिळाली चिठ्ठी

  • गद्दारांना पाडा असं आवाहन करण्याची विनंती

  • पवारांनी उपस्थित जनसमुदायाला तीन वेळा गद्दारांना पाडा पाडा पाडा असे आवाहन केलं

  • जनसमुदायाने केला जल्लोष

नेमकं काय घडलं?

वाईमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार मकरंद पाटील आणि शरद पवार गटाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी वाईमध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी पिसाळ यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं.

शरद पवार भाषण करत असताना त्यांच्याकडे प्रेक्षकातून एक चिठ्ठी आली. ती चिठ्ठी पवारांनी वाचली. गद्दारांचं काय असा प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आला होता. त्याचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले की, गद्दारांचं काय असा प्रश्न विचारण्यात आला आहे. गद्दारांना पाडा, पाडा, पाडा. असं आवाहन केलं आणि उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला आहे.

शरद पवार यांची शुक्रवारी इचलकरंजी येथे झालेली सभा ही तुफान गाजली होती. शरद पवारांनी भरपावसात भाषण केलं. 2019 रोजी शरद पवार यांनी भर पावसात केलेल्या भाषणाची आठवण झाली. या सभेची संपूर्ण देशभर चर्चा झाली आणि भाजपचे उमदेवार उदयनराजे भोसले यांचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे शुक्रवारचं भरपावसातलं भाषण आणि आजचं गद्दारांना पाडा म्हणून केलेलं आवाहन सध्या चर्चेत आहे.

शरद पवार यांनी केलेल्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा-

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com