भाजपसह अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले 'सत्तेतून खाली खेचायचं...'

भाजपसह अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले 'सत्तेतून खाली खेचायचं...'

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
Published by :
shweta walge
Published on

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आपल्याला भाजपला सत्तेतून खाली खेचायचं आहे असं म्हणत सरकारवर निशाणा साधला. तर आपल्यातल्या काही लोकांनी वेगळा मार्ग निवडला. 'त्यांनी आपला अध्यक्षही निवडला' असं म्हणत अजित पवार गटावर देखिल हल्लाबोल केला आहे.

अजित पवार गटावर काय म्हणाले शरद पवार?

कधीकाळी आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्विकारला आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या अध्यक्षांची निवड केली. काही लोकांनी दिल्लीच्या दोन कोर्टात आपल्याला नेले आहे. एक निवडणूक आयोग आणि दुसरं सप्रीम कोर्ट. या दोन्ही ठिकाणी आपल्या खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याचा प्रसंग आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी आणला. जेव्हा निकाल लागले तेव्हा सामान्य राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या बाजुने निकाल लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

भाजपवर हल्लाबोल

'19,553 मुली बेपत्ता झाल्याची माहिती माजी गृहमंत्र्यांनी बैठकीत दिली. एवढ्या महिला आणि मुली गायब आहेत, त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल. त्यामुळे राज्यातील महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे. हे सरकार त्यांच्यासाठी काहीच करत नाहीये', त्यामुळे हे सरकार बदलण्याची भूमिका आता आपल्याला घेणं गरजेचं असल्याचं शरद पवारांनी यावेळी म्हटलं.

भाजपसह अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले 'सत्तेतून खाली खेचायचं...'
नवाब मलिकांच्या जागी राखी जाधव मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी

'कंत्राटी पद्धतीने नोकरी देणं म्हणजे त्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसाला नोकरीची खात्री नाही. जेव्हा एखादा माणूस नोकरी करण्याचा विचार करतो तो आयुष्यभरासाठी. पण फक्त अकरा महिन्यांसाठी त्याला कामावर घेणं हे किती योग्य आहे, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. कंत्राटी पद्धातीने नोकर भरती हा प्रकार मी कधीच महाराष्ट्रात पाहिला नाही. मी सुद्धा गृहमंत्री होतो, मुख्यमंत्री होतो. त्यामुळे अकरा महिन्यांनंतर त्यांनी काय करायचं. कंत्राटी पद्धतीवर नोकर भरती करण्याचं वाईट काम या देशात अजूनही कोणी केलं नाही', पण हे भाजपचं सरकार महाराष्ट्रात करत आहे, असं म्हणत शरद पवार यांनी कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या भरती प्रक्रियेवर निशाणा साधला. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com