ब्राम्हण समाजाने इतरांच्या आरक्षणाला विरोध करु नये...वाचा बैठकीनंतर काय म्हणाले शरद पवार
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज ब्राम्हण समाजातील वेगवेगळ्या संघटनांना चर्चेसाठी बोलावलं होतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागच्या काही काळात केलेल्या भाषणांमुळे ब्राम्हण समाजाचं मन दुखावलं, त्यामुळे ती अस्वस्थता दुर करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचं राष्ट्रवादीच्या (NCP) वतीने सांगण्या आलं. या बैठकीनंतर ब्राम्हण समाजाने बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. तसंच शरद पवार यांनी सांगितलं की, कुठल्याही जात धर्माविरोधात वक्तव्य करु नये असं आम्ही संबंधीत नेत्यांना सांगितलं आहे असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं आहे.
शरद पवार यांनी या बैठकीत सांगितलं की, काही संघटनांनी आरक्षण देण्याची मागणी ठेवली होती. त्यावर मी त्यांना आरक्षणाचं सुत्र शक्य नसल्याचं सांगितलं. त्यानंतर काही लोक म्हणाले की, जर आम्हाला आरक्षण नसेल तर कुणालाच देऊ नका, मात्र मी त्यांना सांगितलं की, देशातील दलित आदिवासींना आरक्षण द्यावं लागेल त्याला विरोध करु नये असं मी त्यांना सांगितल्याचं शरद पवार म्हणाले.
समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्याचं निवेदन शरद पवार यांना दिलं असून, लवकरात लवकर यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं असं अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या (Akhil Bhartiy Brahman Mahasangh) वतीने सांगण्यात आलं.