ताज्या बातम्या
शरद पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यातील बोपदेव घाटातील घटनास्थळाला देणार भेट
कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली.
कोंढवा परिसरात तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात तरुणीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला.
गुरुवारी रात्री 11च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर आता आरोपींचा शोध घेणं सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
आरोपींच्या शोधासाठी आणि अटक करण्यासाठी गुन्हे शाखा आणि डीबीची दहा पथके नेमण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे बोपदेव घाटातील घटनास्थळाला भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. थोड्याच वेळात शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्या परिसराची पाहणी करणार आहेत.