'...याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही', शाहू छत्रपती महाराजांचं मोठं विधान
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सरकार मराठा समाजाला आरक्षण कसे देणार, हे कळायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ते नवीन राजवाडा येथे गणेश प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधत होते.
ते म्हणाले की, आरक्षण कसे द्यावे, यातला मी तज्ज्ञ नाही. लोकांना योग्य मार्गदर्शन करणे नेत्यांचे कर्तव्य आहे. आरक्षण मिळणार कि नाही हे स्पष्ट सांगावे. लोकांना झुलवत ठेवणे योग्य नाही. आरक्षणाविषयी सरकारच्या मनात काय आहे, हे मला माहीत नाही. ते कशातऱ्हेने आरक्षण देणार, हे सर्वांना कळायला हवे. घटनादुरुस्तीशिवाय ते मिळणार नाही, हे तितकेच खरे आहे. असं ते म्हणाले आहेत.
संसद एक असे स्थान आहे, जिथे सर्वांना विचार व्यक्त करता येतात. चर्चाही करता येते. जेणेकरून सर्वांना लोकांसाठी, देशासाठी चांगले निर्णय घेता येतात. देशात १९५० पासून घटना अस्तित्वात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिंहाचा वाटा उचलून घटना तयार केली.असं ते म्हणाले.