माझी हत्या होऊ शकते, पोलिसांनी नेल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप

माझी हत्या होऊ शकते, पोलिसांनी नेल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप

Published by :
Jitendra Zavar
Published on

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वेगळ वळण लागल्याचं पाहायला मिळतंय. पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील या आंदोलकांनी आज थेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी धाव घेतली आणि चप्पलफेक आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर आता गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadawarte) यांच्या चौकशीसाठी मुंबई पोलीस पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर आंदोलन प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे.

माझी हत्या होऊ शकते, पोलिसांनी नेल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप
Sharad Pawar यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलक मद्यधुंद | VIDEO

पोलिसांनी तिथून सादावर्तेंना गावदेवी पोलीस ठाण्यात नेलं. मात्र पोलिसांनी मला काहीही सांगितलं नाही. मला कोणतीही नोटीस दिली नाही. मला डायरेक्ट घेऊन आले. माझ्या जिवीताला धोका आहे. माझा खून झाला तर याला गृहमंत्री जबाबदार असतील, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिसांच्या ताब्यातून दिली आहे. तर आमच्या जीवीताला धोका आहे. गुणरत्न सदावर्तेंना काही झालं तर त्याला जबाबदार शरद पवार असतील, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सादवर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी दिली आहे. या आंदोलनावरून राज्यातलं राजकारण सध्या चांगलचं तापलं आहे.

जयश्री पाटील या स्वत: पोलीस स्थानकात गेल्या आहेत. आपल्या पतीला अडकवण्याचा प्रयत्न होत असून, शरद पवार त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतायेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com