स्टेट बँक ऑफ इंडियाचं गृहकर्ज आजपासून महागलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं 15 डिसेंबर 2022 पासून गृहकर्जाचे दर वाढवले आहेत. केनं गृहकर्जाच्या व्याजदरात 0.35 टक्के वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत घर खरेदी करणाऱ्यांना महागड्या दरानं गृहकर्ज घ्यावं लागणार आहे. जर तुम्ही पूर्वी 8.40 टक्के दरानं 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं असेल, तर आता तुम्हाला त्यावर अधिक ईएमआय भरावा लागणार आहे.
जर सध्याच्या SBI ग्राहकानं एसबीआयकडून 8.40 टक्के व्याजदरानं 30 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं असेल, तर आता कर्जावरील वाढीनंतर, व्याज दर 8.75 टक्के लागू झाला आहे. म्हणजेच, आता या नवीन दरांनुसार गृहकर्जाचे हफ्ते निश्चित केले जाणार आहेत. 800 पेक्षा जास्त CIBIL स्कोअर असलेल्यांसाठी SBI च्या नवीन गृहकर्जावर 15 डिसेंबर 2022 पासून सुरुवातीचा व्याजदर 8.90 टक्के आहे. गृह आणि घराशी संबंधित कर्जासाठी कमाल व्याजदर आता 11.05 टक्क्यांपर्यंत आहे. एकंदरीत, CIBIL स्कोअरनुसार व्याज ग्राहकांना भरावं लागणार आहे.
MCLR आधारित वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जाचे व्याजदर 8 टक्के ते 8.60 टक्के आहेत. पूर्वी ते 7.75 टक्के ते 8.35 टक्के होते. ऑटो, गृह आणि वैयक्तिक कर्ज यांसारख्या बँकेचे बहुतेक कर्ज व्याजदर यावर आधारित आहेत. ईएमआय 26511 रुपये होईल. म्हणजेच आता तुम्हाला दर महिन्याला 666 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. वार्षिक आधारावर जोडल्यास वर्षभरात एकूण 7992 रुपये अधिक भरावे लागतील.