बापूंच्या हत्येसाठी सावरकरांनी गोडसेला मदत केली - तुषार गांधी
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान विनायक सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी यांनी एक धक्कादायक आरोप केला आहे. त्यांनी सोशल मिडियावर ट्विट करुन एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
“सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर नथुराम गोडसेलाही बापूंची हत्या करण्यासाठी एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे कोणतंही शस्त्र नव्हतं.” असे वक्तव्य महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी यांनी केलं आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर घेतलेल्या सभेत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वक्तव्य केलं. नथुराम गोडसे यांनी काल रात्री उशिरा याबाबत ट्विट केलं आहे. सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, असं राहुल गांधी म्हणाले. तर, सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती याचेही कागदपत्र राहुल गांधींनी माध्यमांसमोर सादर केले. यावरून राज्यात खळबळ माजली होती.