सावरकरांनी असे विधान केलं होते याचे पुरावे द्या; सात्यकी सावरकरांचे शिवानी वडेट्टीवारांना आव्हान

सावरकरांनी असे विधान केलं होते याचे पुरावे द्या; सात्यकी सावरकरांचे शिवानी वडेट्टीवारांना आव्हान

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या विधानावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावकरांबाबत केलेल्या विधानावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याविरोधात भाजपाने आक्रमक होत सावरकर गौरव यात्राही काढली होती. तर, उध्दव ठाकरेंनी राहुल गांधींना इशारा दिला होता. हे वातावरण शांत होता न होताच पुन्हा एकदा काँग्रेसकडून सावरकरांचा अपमान करण्यात आला आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा कधीच मोर्चा काढणार नाही. कुठला मोर्चा काढतात? सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात. सावरकर मला आणि माझ्यासोबत महिला, भगिनी उपस्थित आहेत. सर्वांना भीती वाटत असेल कारण की सावरकरांचे विचार होते. सावरकर म्हणायचे, की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हा तुम्ही आपला राजकीय विरोधकाविरुध्द वापरलं पाहिजे. मग, माझ्या सारख्या इथे उपस्थित महिला-भगिनींना कसं सुरक्षित वाटेल. आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात, असे शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी शिवानी वडेट्टीवार यांना आव्हान दिले आहे. सात्यकी म्हणाले की, "सध्या सावरकरांना मुद्दाम लक्ष्य केले जात आहे. सावरकर हे हिंदुत्ववादी नेते होते. सध्या देशात, राज्यात हिंदुत्वादी विचारांचे सरकार आहे. "शिवानी वडेट्टीवार यांनी अत्यंत चुकीचे विधान केलेले आहे. मात्र सावरकरांनी त्यांच्या 'सहा सोनेरे पाने' या पुस्तकात असे कुठलेही वाक्य लिहिलेले नाही. ते पुस्तक मी वाचलेले आहे. त्यांनी ते वाक्य काढून दाखवावे. असे सात्यकी सावरकर म्हणाले.

सावरकरांनी असे विधान केलं होते याचे पुरावे द्या; सात्यकी सावरकरांचे शिवानी वडेट्टीवारांना आव्हान
काँग्रेसकडून सावरकरांचा पुन्हा अपमान! वडेट्टीवारांच्या कन्येच्या वक्तव्याने वाद; बलात्काराला राजकीय हत्यार...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com