saturn occultation
saturn occultation

Saturn Occultation १४ ऑक्टोबरच्या रात्री चंद्र शनी ग्रहाला झाकणार

येत्या १४ ऑक्टोबरच्या रात्री चंद्र शनी ग्रहाला आपल्या मागे झाकणार आहे. जसा चंद्र सूर्य ग्रहणाच्या वेळी सूर्याला आपल्या मागे झाकतो.
Published by :
Team Lokshahi
Published on

येत्या १४ ऑक्टोबरच्या रात्री चंद्र शनी ग्रहाला आपल्या मागे झाकणार आहे. जसा चंद्र सूर्य ग्रहणाच्या वेळी सूर्याला आपल्या मागे झाकतो. जेव्हा एक खगोलीय पदार्थ दुसऱ्या खगोलीय पदार्थाला आपल्या मागे झाकतो तेव्हा याला पिधान असे म्हणतात. 

शनीचे हे पिधान संपूर्ण भारतातून दिसणार आहे.  हे पिधान आपल्याला नुसत्या डोळ्यांनी पण दिसु शकेल. पर तुमच्या कडे एखादी लहान दुर्बिण असेल किंवा एखादी द्विनेत्री - बायनोक्यूलर असे तर या पिधानाचे तुम्हाला चांगले निरिक्षण करता येईल.  आणि खगोलिय दुर्बिण असेल तर शनीची कडी सुद्धा दिसतील.

निरिक्षणास रात्रीच्या सुमारे ११ः३० वजल्या पासून सुरवात करावी.  चंद्राच्या पूर्वेला तुम्हाला शनी सहज ओळखता येईल. तुम्हाला दिसेल की शनी आणि चंद्र एक मेकांच्या जवळ येत आहेत. आणि मग चंद्र हळू हळू शनीला आपल्या मागे झाकेल.  त्या नंतर सुमारे तास भरा नंतर आपल्याला शनी परत एकदा चंद्राच्या मागून बाहेर येताना दिसेल.

शनीच्या या पिधानाच्या वेळा वेगवेगळ्या शहरांसाठी वेगवेगळ्या असतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com