Satara : सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ
इम्तियाज मुजावर, सातारा
परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. साताऱ्यात मुसळधार पाऊस पडत असून कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पावसामुळे धरणातही पाण्याची आवक वाढल्याने आज सकाळीच सात वाजता कोयनेसह, वीर, कण्हेर आणि उरमोडीतूनही पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस होत असून ओढ्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. तलावांतील पाणीसाठ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
कोयनानगर येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात तर सकाळच्या सुमारास 11046 हजार क्यूसेकने पाण्याची आवक होत होती.
खरीप हंगामातील पिकांत पाणी साचून नुकसान होऊ लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कोयनेतून 11 हजार 046 क्युसेक्स पाण्याचा पुन्हा विसर्ग सुरु करण्यात आला.