Satara : साताऱ्याचं कास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरलं
इम्तियाज मुजावर, सातारा
पावसानंतर सातारच्या कास पठारावर रंगीबेरंगी फुलं बहरायला लागली आहेत. सप्टेंबरचा तिसरा आठवडा सुरू असून फुलांना बहर आला आहे. सगळीकडे विविध रंगाची फुलं पाहायला मिळत आहेत. यासोबतच फूल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
दाट धुक्याची चादर आणि थंडगार वाहणारे वारे या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक कास पठारवर येत असतात. फुलांच्या विविध जाती कास पठारावर उमलू लागल्या आहेत. जागतिक वारसास्थळ आणि विविध रंगांच्या फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर दुर्मिळ आणि रंगबेरंगी फुल उमललेली आहेत.
महाराष्ट्रासह देश- विदेशांतील पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत. सध्या कास पठारावर 'फुलोत्सव' पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
कास पठारावर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत आकर्षक फुले येत असून येथे फुलांच्या 800हून अधिक प्रजाती आढळत असल्याची माहिती मिळत आहे. सध्या पठारावर फुलांची चादर पसरल्याची पाहायला मिळत आहे.