Satara Girl, Mount Kilimanjaro: 12 वर्षीय धैर्याचा आफ्रिकेत झेंडा! जगातील अवघड समजले जाणारे किलीमंजारो शिखर केले सर...

Satara Girl, Mount Kilimanjaro: 12 वर्षीय धैर्याचा आफ्रिकेत झेंडा! जगातील अवघड समजले जाणारे किलीमंजारो शिखर केले सर...

साताऱ्याच्या धैर्याने तिची इच्छाशक्ती, जिद्द, धाडस, चिकाटी अन् धैर्य उराशी बाळगून कोणाच्याही मदतीशिवाय जगातील अवघड समजले जाणारे किलीमंजारो शिखर सर केला आहे
Published by :
Team Lokshahi
Published on

सध्या मुल-मुली हा भेदभाव बोलण्यासाठीच पाहायला मिळतो. आज स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन पुढे जात आहेत. स्वबळावर स्वताची स्वप्नपूर्ती करत आहेत. अशीच एक स्वप्नपूर्ती साताऱ्याच्या धैर्याने देखील केली आहे. एखादी गोष्ट पुर्ण करायची ठाणली तर काही ही होऊदेत ती गोष्ट पुर्ण करण्यापासून त्या व्यक्तीला कोणीही अडवू शकणार नाही. अशीच साताऱ्याच्या धैर्याने तिची इच्छाशक्ती, जिद्द, धाडस, चिकाटी अन् धैर्य उराशी बाळगून कोणाच्याही मदतीशिवाय जगातील अवघड समजले जाणारे किलीमंजारो शिखर सर केला आहे आणि 12 वर्षीय धैर्याने तिच्यानावाचा झेंडा आफ्रिकेत रोवला आहे. किलीमंजारो शिखर म्हणजे मृत ज्वालामुखीच.धैर्याने ५ हजार ६५० मीटर उंचीवर किलीमंजारो शिखर पार केले. दि.२५ ते ३० ऑक्टोबर या सहा दिवसात धैर्याने ही कामगिरी पार पाडली.साताऱ्यात परतल्यावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

अवघ्या १२ वर्षांच्या धैर्या कुलकर्णी हिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमंजारो शिखर सर केले आहे. आई-वडिल, पालकांशिवाय हे शिखर सर करणारी ती देशातील पहिली लहान मुलगी ठरली आहे.आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिका येथील किलीमंजारो हे शिखर गिर्यारोहकांसाठी एक आव्हानच मानले जाते. ट्रेकिंग,गिर्यारोहण करणाऱ्यांना हे शिखर सर करण्याचे स्वप्न सतत खुनावत असते.तब्बल ५ हजार ८५० मीटर इतकी उंची असलेले शिखर अनेक आव्हानांवर मात करत सर करावे लागते.उणे ५ ते ६ अंश सेल्सिअस तापमान, बर्फ, थंडी, ऑक्सिजन कमी,रात्रीचा प्रवास अशा स्थितीत हे शिखर चढावे लागते.वयाच्या सहा वर्षांपासून ट्रेकिंगचा छंद लागलेल्या सातारा येथील धैर्या कुलकर्णी हिने किली मंजारो शिखर पार केले. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com