Satara Bakasur Gang
Satara Bakasur GangTeam Lokshahi

Satara Crime : कॉलेजच्या तरुणांमध्ये दहशत पसरवणाऱ्या 'बकासुर गॅंग'ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bakasur Gang ग्रुपच्या सदस्यांनी 'ना जिंदगी का मोह ना मृत्यू का भय' असं आपल्या अकाउंटवर लिहले आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

सातारा | प्रशांत जगताप : शहरातील महाविद्यालयीन युवकांमध्ये दहशत माजवणारी 'बकासुर गॅंग'ला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लोकशाहीच्या बातमीची दखल घेत पोलिसांनी गँगचा म्होरक्या यश जांभळे याला अटक केली आहे. या गँगचा विस्तार संपूर्ण राज्यभर असल्याचं सोशल मीडियावरून स्पष्ट होत आहे. इन्स्टाग्रामवर नांदेड, कल्याण, कराड, सातारा, जावली, बेळगाव, कवठेमहांकाळ असं लिहलेले ग्रुप आढळून येत आहेत. विशेष म्हणजे या गँगमध्ये अल्पवयीन आणि महाविध्यालयीन युवकांचा समावेश आहे. या ग्रुपच्या सदस्यांनी 'ना जिंदगी का मोह ना मृत्यू का भय' असं आपल्या अकाउंटवर लिहले आहे.

साताऱ्यातील कला व वाणिज्य कॉलेज येथे कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन विद्यार्थ्याला लूटल्या प्रकरणी 'बकासुर गँग'च्या 8 जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कला व वाणिज्य कॉलेज परिसरात फिर्याद अल्पवयीन युवक हा मित्रासोबत बोलत उभा असताना त्या ठिकाणी आलेल्या सात ते आठ युवकांनी शिवीगाळ करत पैशाची मागणी केली. त्यातील एकाने कोयता उगारून युवकाच्या खिशातील पाकीट, हातातील घड्याळ काढून घेतलं आणि इतरांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी संबंधित संशयतांनी 'आम्ही शाहूपुरीचे डॉन आहोत, आम्हाला पैसे देत नाहीस म्हणत, "चांगलं मारा, त्याचे हातपाय तोडा म्हणजे त्याला आपल्या बकासुर गँगची दहशत कळेल" असं जोरात ओरडून तक्रारदार युवकाजवळ असलेले तेराशे चाळीस रुपयाचे साहित्य आणि पाकीट हिसकावून नेल्याच्या कारणावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Satara Bakasur Gang
'ही दोस्ती तुटायची नाय'..पहा Zomato आणि Swiggy डिलिव्हरी बॉईजच्या खास मैत्रीचा व्हिडिओ

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी दोन मुलं अल्पवयीन आहेत. या टोळीला न्यायालयासमोर हजर केलं असता, त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, हत्याराने दहशत करणे, गर्दी करुन मारामारी करणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com