IPL मध्ये संजू सॅमसनचा दबदबा! धडाकेबाज फलंदाजी करून एकाचवेळी मोडला धोनी, रोहित अन् कोहलीचा विक्रम
Sanju Samson IPL Record : आयपीएल २०२४ च्या ५६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा २० धावांनी पराभव केला. या सामन्यात संजूने ८६ धावांची तुफानी खेळी केली. परंतु, शेवटच्या सत्रात संजू बाद झाला आणि राजस्थानचा संघ पराभूत झाला. संजूला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही, पण त्याने मैदानात धावांचा पाऊस पाडून आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २०० षटकार ठोकणारा संजू सॅमसन पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.
संजूने अशी कामगिरी करून धोनीचा विक्रम मोडला आहे. धोनीनं १६५ इनिंगमध्ये आयपीएलमध्ये २०० षटकार ठोकले होते. तर संजूने फक्त १५९ इनिंगमध्ये हा कारनामा केला आहे. याशिवाय विराट कोहलीने आयपीएलच्या १८० इनिंगमध्ये, रोहितने १८५ इनिंगमध्ये, तर रैनाने १९३ इनिंगमध्ये २०० षटकार ठोकण्याची कामगिरी केलीय. म्हणजेच संजूने एकाच वेळी धोनी, कोहली, रोहित आणि रैनाला या विक्रमात मागे टाकलं आहे.
संजू सॅमसन - १५९ इनिंग
एम एस धोनी - १६५ इनिंग
विराट कोहली - १८० इनिंग
रोहित शर्मा - १८५ इनिंग
सुरेश रैना - १९३ इनिंग
यंदाच्या आयपीएल हंगामात संजू सॅमसन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. संजूने ११ सामन्यांमध्ये आतापर्यंत ४७१ धावा कुटल्या आहेत. धावांच्या शर्यतीत विराट कोहली पहिल्या नंबरवर आहे. कोहलीने आतापर्यंत ११ सामन्यांत ५४१ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराजने ११ सामन्यांमध्ये ५४१ धावा केल्या आहेत. भारताच्या टी-२० वर्ल्डकप संघात संजू सॅमसनलाही संधी देण्यात आली आहे.