'प्रकाश आंबेडकर यांची ताकद जेव्हा मिळेल तेव्हा...' संजय राऊतांचे मोठे विधान
खासदार संजय राऊत आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत काँग्रेसचे झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडे तीनशे कोटी रुपयांची रोकड सापडली. या प्रकरणावर प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, भाजपचे नेते काय चिंचोके घेऊन निवडणुका लढतात का? भाजप नेत्यांचे काय असावा असा प्रश्न राऊत यांनी केला आहे.
ते म्हणाले की, भाजपचे नेते देशातील जातीपातींमध्ये वाद लावायचा काम करत आहे. महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद राज्यात कधीच नव्हता. पण हे सध्या सुरु आहे. सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे. जे कोणी दुर्बल आहेत त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाचे प्रश्न सोडवतात, युद्ध थांबवतात. पण महाराष्ट्रच्या प्रश्नावर त्यांची भूमिका आली का?, असा सवाल ही संजय राऊत यांनी केला.
लोकसभेचा विषय निघाला आणि सोलापूरचा विषय आला की प्रकाश आंबेडकर काय करतील असा प्रश्न येतो. पण देशात जी हुकूमशाही सुरु आहे त्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांची भूमिका स्पष्ट आहे. मोदींचा पराभव झाल्याशिवाय संविधान रक्षण होणार नाही हे त्याना माहितीये. देश वाचवण्यासाठीच्या लढाईत प्रकाश आंबेडकर हे आघाडीत असतील. प्रकाश आंबेडकर यांची ताकद जेव्हा मिळेल तेव्हा विजयाचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे सोलापूरचे राजकारण देखील तुम्हाला 2024 ला पूर्ण बदलले दिसेल. भाजपची पाटी पूर्णपणे कोरी झालेली असेल.
मागच्या दहा वर्षासारखे घाणेरडे राजकारण आम्ही कधीचं पहिले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांचीचं होती, आणि त्यांचीच राहिलं.
केसीआरचा पराभव करणे हा सर्वात मोठा टास्क होता, काँग्रेसने ते केले. केसीआर हे त्या राज्याचे निर्माते होते, पण ते मोदी शाह करू शकले नाही, भाजपला केवळ 10 जागा मिळाल्या. राजस्थानमध्ये प्रत्येक वेळी जनता शासन बदलते. मध्यप्रदेशचा निकाल हा आश्चर्यकारक आहे.
शिवसेना संपवण्याचे प्रयत्न मागच्या 60 वर्षात अनेक वेळा झाले पण शिवसेना कधीच संपणार नाही. देशाच्या इतिहासात मोदी शहा संपून जातील पण शिवसेना संपवणार नाही. बाळासाहेबांची जी शिवसेना इलेक्शन कमिशन कोण्या ऐऱ्या गैऱ्या शिंदेच्या हातात देते, त्यांच्यावर काय विश्वास ठेवणार. जगभरात evm रद्द झाले आहे, बांगलादेशमध्ये देखील विरोधीपक्षाने विरोध केला. बांगलादेशला evm आपणच पुरवठा करतोय. 27 वेळा आम्ही आयोगाकडे बॅलेटची मागणी केलीय जो पर्यंत मोदी शाह आहेत तो पर्यंत हे कधीच मान्य होणार नाही.
पोस्टल बॅलेटवरचा ट्रेंड वेगळा आहे आणि evm वरचे निकाल वेगळे आहेत. या देशातील एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. तुम्हाला सोयीच्या राज्यात, मतदारसंघात मिवडणूक घेऊन दाखवा. मग जनता त्या निकालावर विश्वास ठेवेल
ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद राज्यात कधीच नव्हता. पण हे सध्या सुरु आहे. सर्वांना आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे.जे कोणी दुर्बल आहेत त्याना आरक्षण दिलं पाहिजे .
जरांगे पाटील यांच्याविरुद्ध भुजबळ यांना फडणवीस यानी पॉवर ऑफ अटरणी दिलीय असे वाटतंय. हिंदू मुस्लिम वाद आता चालणार नाही हे भाजपच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता जातीजातीत भांडण लावले जातायत. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, दुसऱ्याच्या ताटातील न हिसकावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही आमची मागणी.