Devendra Bhuyar
Devendra BhuyarTeam Lokshahi

"देवेंद्र भुयार दिलदार कार्यकर्ते, त्यांनी मलाही..." संजय राऊत यांचं स्पष्टीकरण

Devendra Bhuyar यांनी या मुद्यावरुन शरद पवारांना भेटणार असल्याचं सांगितलं होतं.
Published by :
Sudhir Kakde
Published on

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा पराभव झाला आणि भाजपचे थेट तिन्ही उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीचं विजयाचं समीकरण चुकल्यामुळे महाविकास आघाडीत मोठी खळबळ माजली. त्यानंतर संजय राऊत यांनी देवेंद्र भुयार यांचं मत फुटल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता अमदार देवेंद्र भुयार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, संजय राऊतांच्या आरोपांवर टीका केली आहे. तसंच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन अपक्षांची बाजू मांडणार असल्याचं सांगितलं आहे. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

Devendra Bhuyar
Bachchu Kadu : अपक्षाला बदनाम करून चालत नाही, पक्षाचेही चुकलेच

देवेंद्र भुयार यांना मी ओळखतो. ते दिलदार कार्यकर्ते आहेत, आमदार आहेत. त्यांनी पवार साहेबांसोबत सोबत चर्चा केली पाहिजे. मलाही त्यांनी फोन भेटीसाठी फोन केला होता. मी अजिबात नाराज नाही, आता निवडणूका संपल्या आहेत. लोकशाहीत असे निकाल लागत असतात, त्यामुळे आभाळ फाटत नाही. अजिबात फोडाफोडी झालेली नाही. काही अपेक्षित मतं होती पण महाविकास आघाडी सरकार मधील मतं फुटलेली नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी युटर्न मारला आहे.

Devendra Bhuyar
'ईडी आमच्या हातात दिली तर देवेंद्र फडणवीससुद्धा आम्हाला मतदान करतील'
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com