Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, "अमित शहा यांचा राजीनामा..."
Sanjay Raut Press Conference: अमित शहा आमच्याशी लढायला पूर्ण ताकद लावत आहेत. पण सर्व दहशतवादी सुटले आहेत. मणिपूर, जम्मु- काश्मीर असो, अमित शहाच याला जबाबदार आहेत. अमित शहांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर मोदींकडे थोडी नैतिकता बाकी असेल, तर पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. गृहमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांचं देशाकडे लक्ष नाही. देशाची सुरक्षा, कायदा-सुव्यवस्थेकडे त्यांचं लक्ष नाही. निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या. त्यानंतर इकडे तिकडे दबाव टाकायचा आणि आपल्या विरोधकांना संपवून टाकायचं. देशाच्या दुश्मनांना संपवून टाका, असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला केलं आहे.
पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, आपले सैनिक दररोज शहीद होत आहेत. पण तुमच्या चेहऱ्यावर थोडंही दु:ख नाही, हे मी पाहत आहे. दररोज सैनिकांची हत्या होत आहे. आम्ही त्याला बलिदान बोलू, पण या हत्या आहेत. या हत्येला जबाबदार मोदी आणि शहांचं सरकार आहे. ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, त्या क्षणी काश्मीरमध्ये सर्वात मोठा हल्ला झाला. यापूर्वीचेच गृहमंत्री, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून काहीही ठोस कार्य झालं नाही.
जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला आहे. अमित शहा देशाचे गृहमंत्री म्हणून फक्त हात चोळत बसलेले आहेत किंवा राजकारणात व्यस्त आहेत. एकनाथ शिंदे, भावना गवळी, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर असतील, काही लोकांना जिंकवून दिलं आहे. पैशाच्या ताकदीनं ते जिंकले आहेत. पण सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी साथ दिल्यानं आरएसस आणि भाजप पूर्णपणे भ्रष्ट आणि बदनाम झाली आहे, असंही शिंदे म्हणाले.