शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना दिलेल्या 'क्लीन चिट'ला नव्यानं आव्हान; संजय राऊत म्हणाले...

शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना दिलेल्या 'क्लीन चिट'ला नव्यानं आव्हान; संजय राऊत म्हणाले...

शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अजित पवारांना शिखर बँक घोटाळा प्रकरणात दिलेल्या क्लीन चिटला नव्याने आव्हान देण्यात आलं आहे. अजित पवारांच्या व्यवहारात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयामध्ये निषेध याचिका सादर करण्यात आली आहे. तर याचिकेवर 25 जुलैला सुनावणी पार पडणार आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चीट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे. अशाप्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे. त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारने.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, त्या आरोपीने पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा लाखो, कोट्यावधी रुपयांचा जो खर्च झाला खटला चालवताना ते तुम्ही कोणाच्या खिशातून घेणार फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी, अमित शाहांच्या पगारातून कापणार. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com