Sanjay Raut : ज्यांनी क्रॉस वोटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला

Sanjay Raut : ज्यांनी क्रॉस वोटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत म्हणाले की, क्रॉस वोटिंग झालं आहे हे काँग्रेस पक्षाने मान्य केलं आहे. आम्हालाही तो अनुभव आलेला आहे. त्यांना फार मोठ्या रकमा दिलेला आहे, जमिनीचा तुकडा दिलेला आहे. हे आता कागदावरती आलेलं आहे. दोनशे - दोनशे कोटींचे निधी मतदानकरण्यापूर्वी मंजूर केलेलं आहे. ही एक प्रकारची लाच आहे. तुम्ही 25 जूलैला संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे ना. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी. मग अशाप्रकारे आमदारांना विकत घेऊन सरकार बनवणे असंविधानिक.

यासोबतच जे सरकार बेकायदेशीर आहे, आमदार अपात्र ठरू शकतात अशाप्रकारची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीला असताना त्याच आमदारांकडून पुढल्या 6 वर्षासाठी आमदार निवडून घेणं हे असंविधानिक आहे. म्हणून घटनेचं किंवा संविधानाचे खरे हत्यारे कुणी असतील तर ते भारतीय जनता पक्षाचे सरकार, नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस वोटींग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडवून आणला होता. त्याच्यामुळे नाना पटोले किंवा काँग्रेस पक्षाचं सिनीयर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्यांने घेण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यांच्या पक्षाची एक रचना असते. त्या रचनेनुसार कारवाई होत असते. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com