Sanjay Raut | सांगलीत चंद्रहार पाटीलच मविआचे उमेदवार असतील; संजय राऊतांचे विधान
सांगलीच्या जागेवरुन महायुतीतील तिढा आणखी सुटलेला नाही. सांगलीच्या जागेवरुन शिवसेचा आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. यातच संजय राऊत सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. येथून शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत हे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगलीच्या जागेवरुन प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
आज सकाळीच काँगेस हायकमांडशी बोलणं झालं आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील, हे जबाबदारीने बोलतो आहे. शेवटपर्यंत आघाडीमध्ये पेच आहे. पण एकमेकांशी चर्चा करून तो सोडवला जाईल. काही ठिकाणी शिवसेना, काही ठिकाणी काँग्रेस लढण्यासाठी आग्रह आहे. पण वरिष्ठ पातळीवरून कार्यकर्त्यांना सांगायचं असतं. त्यामुळे सगळ्या पक्षाचे नेते मिळून याबाबत निर्णय घेतील, असं संजय राऊत म्हणाले.
मैत्रिपूर्ण लढतीबाबत बोलणारे अनिस अहमद कोण? मैत्रिपूर्ण लढतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. मैत्रिपूर्ण लढत ही घातक आहे, मग सगळीकडेच मैत्रिपूर्ण लढत होईल. नाना पाटोले बोलत असतील तर चांगली गोष्ट आहे. गिरीश महाजन जळगाव वाचवा. त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही शिवसेना उमेदवार उभा केला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर ते म्हणाले की, पण भाजपाने त्यांच्यावर जे आरोप केले आहेत,त्याचे काय? आता त्यांच्याकडे वेगळी वाशिंग मशीन आली आहे का? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.