Sanjay Raut on Neet Exam : 'न्यायालयाच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार'
नीट परिक्षेबाबत निकालाचा केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे. तर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. विरोधी पक्ष नेत्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशी मागणी सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांनी केलेली आहे. तर विरोधकांनी वातावरण दूषित केल्याचं आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं आहे.
नीटमध्ये पेपर लीक झाल्याचा आरोप झाला होता आणि त्याचबरोबर गैरप्रकार या परिक्षेमध्ये झाल्याचे आरोप केला जात होता. देशभरातील पालक आणि विद्यार्थी संतप्त झालेले असतानाच विरोधकांनी सुद्धा या मुद्द्यावर चर्चेची मागणी केलेली होती आणि आता या परिक्षेबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
न्यायमूर्तींच्या मागे सत्यमेव जयतेचा बोर्ड आहे ना तो काढावा लागेल हे सातत्याने आम्ही सांगतोय. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचे घटनाबाह्य सरकार चालवण्यात येते न्यायालयाच्या पाठिंब्याने स्पष्ट म्हणतो. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. जर घोटाळा झालाच नाही, पेपर फुटलेच नाही मग पेपर फोडणाऱ्यांना इतक्या लोकांना सीबीआयने अटक का केली आहे हा सादा प्रश्न आहे. आतापर्यंत 27 लोकांना अटक केली आहे. विशेष पथक का नेमलं आणि अटक का केली याचं उत्तर न्यायालय देऊ शकेल का? असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.