बजेटमध्ये मुंबईला चमचाभर हलवासुद्धा मिळाला नाही; संजय राऊतांची भाजपावर टीका
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल अर्थसंकल्प सादर केला. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी भाजपावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणूक जिंकत शिवसेनेची सत्ता घालवून भविष्यात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी आणि तुकडे करुन समाधान मिळत असेल, तर शक्य नाही. अर्थसंकल्पात मुंबईतील खासदारांच्या अनेक मागण्या होत्या. तरीही वाटण्याचा अक्षदा दाखवण्यात आला आहे. असे राऊत म्हणाले.
अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्या मुंबई आणि महाराष्ट्राला काय मिळालं? तर अर्थसंकल्पाआधी अर्थखात्यात दक्षिण ब्लॉगला बंद खोलीत हलवा करतात. तो चमचाभर हलवा सुद्धा मुंबईच्या हातावर मिळाला नाही,अशी टीका राऊत यांनी केली आहे.
यासोबतच ‘अमृत काळ’ हा भाजपाच्या निवडणुकांसाठी असेल. हे पूर्ण निवडणुकीचा अर्थसंकल्प होता. जनतेच्या पैशातून २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका कशा लढल्या जातील यांचं उत्तर उदाहरण म्हणजे कालचं बजेट असे म्हणत राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.