सोमय्या सारख्या आरोपीला राज्यपाल कसे भेटतात? राऊतांचा सवाल
मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) म्हणा्ले, त्यांनी राष्ट्ररतींनाही भेटावं, गृह सचिवांनाही भेटावं. मात्र मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी असलेल्या किरीट सोमय्याला कसं भेटतात असा सवाल संजय राऊत यांनी केला. राज्यपालांनी विचार करावा की देशात यामुळे काय संदेश जाईल असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
लुटलेले पैसे राजभवनाला दिले, मग राजभवनाचीही चौकशी करावी काय? किरीट सोमय्या यांचे अनेक घोटाळे समोर येत आहेत. तरीही राज्यपाल त्यांना भेटत आहेत. राजभवन राज्यातील गुन्हेगारांना साथ देतंय का? तसंच दिल्लीत आणि तुमची जिथे जिथे सत्ता असेल तिथे तक्रारी करा असं किरीट सोमय्या म्हणाले.
दरम्यान, माझ्या नावाने पोलिसांनी जी तक्रार दाखल केली आहे, ती खोटी असून FIR ही खोटी आहे, हे खार पोलीस स्टेशननेही मान्य केले आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेनेच्या गुंडांना वाचविण्यासाठी ही बोगस एफआयआर दाखल करण्यात आली असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले. याप्रसंगी मुंबई पोलीसांविरूद्ध तक्रार करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या हे भाजप शिष्टमंडळासोबत आज दुपारी 12.30 वाजता राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी चर्चा केली असता, संजय पांड्येंना मुख्यमंत्र्यांनी निलंबित करावे अशी मागणी यावेळी सोमय्यांनी केली.