Sanjay Raut: मोहन भागवत कोणत्या नेत्याला म्हणाले 'सुपरमॅन'? खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
Sanjay Raut Press Conference: एका व्यक्तीला आधी सुपरमॅन, नंतर देवता आणि त्यानंतर भगवान व्हायचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं होतं. भागवतांनी कोणत्या नेत्यावर निशाणा साधला आहे? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशातच खासदार संजय राऊत यांनी भागवत यांच्या विधानाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपण टीका केली आहे.
पत्रकार परिषदते खासदार संजय राऊत काय म्हणाले?
मोहन भागवत यांच्या मनात कोण सुपरमॅन आहे, विष्णूचा अवतार कोण आहे. नॉन बायोलॉजिकल व्यक्ती कोण आहे, हे संपूर्ण देशाला माहित आहे. भागवत साहेबांनी स्पष्ट बोलायला पाहिजे, अल्पमताचं सरकार असूनही या देशात जे काही घडत आहे, ते देशाच्या लोकशाहीसाठी आहे. ते संविधानासाठी ठीक नाही. या सामन्य माणसांनी स्वत:ला देव समजणाऱ्या लोकांना बहुमतापासून दूर ठेवलं. म्हणून मला वाटतं की, या देशात कॉमन मॅनच सुपरमॅन आहे.
राऊत पुढे म्हणाले, एका व्यक्तीला सुपरमॅन व्हायचय आणि तो स्वत:ला देवही पाहतोय, असं वक्तव्य मोहन भागवतांनी केलं होतं, यावर बोलताना राऊत म्हणाले, या देशात एक व्यक्ती आहे, जे स्वत:ला विष्णूचा अवतार समजत आहेत. एका व्यक्तीला असं वाटतंय की, प्रभू श्रीराम यांना मीच अयोध्येच्या मंदिरात घेऊन गेलो आहे. ते नसते तर अयोध्येत भगवान राम यांची प्राणप्रतिष्ठा झाली नसती. या देशात एक व्यक्ती आहे, जी स्वत:ला सुपरमॅन समजते. स्वत:ला अजैविक पद्धतीनं जन्माला आलो, म्हणजे मला देवानं वरुन जन्माला घातलं, अशा पद्धतीनं लोकांना भ्रमित करत आहेत.
एक व्यक्ती आहे या देशात, जी सांगते युक्रेन आणि रशियाचं युद्ध मीच थांबवलं. पण ती व्यक्ती जम्मू काश्मीर आणि मणिपूरचा हिंसाचार थांबवू शकत नाही. मला असं वाटतं, त्याच व्यक्तीविषयी मोहन भागवत बोलले आहेत. काही लोक स्वत:ला सुपरमॅन समजतात. पण या सुपरमॅनच्या पायाखलाची बहुमताची सतरंजी सामन्य माणसाने खेचून घेतली आहे. तो कॉमन मॅन हाच सुपरमॅन आहे, असंही राऊत म्हणाले.