‘सुलतान’ म्हणत राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा, म्हणाले 'राजाच नौटंकी...'

‘सुलतान’ म्हणत राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा, म्हणाले 'राजाच नौटंकी...'

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ‘सुलतान’ म्हणून उल्लेख करत 'राज्यातील सुलतान दुसऱ्या
Published by :
shweta walge
Published on

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ‘सुलतान’ म्हणून उल्लेख करत 'राज्यातील सुलतान दुसऱ्या राज्यातील प्रचारात दंग आहेत' असं म्हणाले. अवकाळी पाऊस कोसळतोय, विदर्भ, नाशिक कोकण ठाणे जिल्ह्यातही मोठं नुकसान झालंय. हे संकट कोसळताना मुख्य सुलतान डेप्युटी सुलतान प्रचारात व्यस्त आहेत, हे गेले नाही तर निवडणूक थांबणार जसं की, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर परिस्थिती आहे. शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतायेत. नाशकापासून नंदुरबारपर्यंत अशीच स्थिती आहे. द्राक्ष गेली आहे. कापूस, फळबागा गेल्या आहेत. पण राज्यातील सरकार कुठंय? आसमानी संकट कोसळत असताना हे सुलतान प्रचारात दंग आहेत. छत्तीसगढ, हैदराबाद, जयपूर, निवडणूक पर्यटन सुरू आहे. आम्ही प्रश्न निर्माण केल्यावर हे लोकांच्या भेटी घेत आहेत. आमचे नेते मात्र अगोदरपासून दौरा करत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

अवकाळी पाऊस कोसळतोय. विदर्भ, नाशिक, कोकण, ठाणे जिल्ह्यातही मोठं नुकसान झालंय. हे संकट कोसळताना मुख्य सुलतान डेप्युटी सुलतान प्रचारात व्यस्त आहेत. जसं काय हे गेले नाहीत तर निवडणूक थांबणारच आहेत! मुख्य जबाबदारी इथून खोके न्यायची होती. विधानसभा अधिवेशन होईल. प्रश्न निर्माण होतील मग आज गेलेत. इथं राजाच नौटंकी आहे, असं म्हणत राऊतांनी सरकारवर घणाघात केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com