Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut, Narendra ModiTeam Lokshahi

लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे आणि...संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी कर्नाटकच्या जनतेने मतदानयंत्रावर बटण दाबताना ‘जय बजरंगबली’ असा उच्चार करावा,
Published by :
shweta walge
Published on

काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी कर्नाटकच्या जनतेने मतदानयंत्रावर बटण दाबताना ‘जय बजरंगबली’ असा उच्चार करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत बोलताना केले होते. या विधानानंतर आता देशातील राजकीय वातवरण चांगलंच तापलं असून विरोधकांकडून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून हल्ला चढवला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

नऊ वर्ष राज्य करूनही पंतप्रधान नरेंद मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे हिंदू देव लागतात. लोकांना धर्मकारणात धुंद करून नशेबाज करायचे आणि निवडणुका जिंकायच्या. हिटलर आणि खोमेनीचे हे मिश्रण आहे. देशाला ते परवडणारे नाही. देश अशाने संपून जाईल. पुन्हा कुणाचा तरी गुलाम होईल. त्यामुळे लोकांनी एकवटायला हवे. निर्भय व्हावे लागेल, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटना दुटप्पीपणा करणार नाही. पण राजकारणी बिघडतील. त्यातून सगळं बिघडेल, असा धोका वर्तवला होता. आंबेडकरांचे हे म्हणणे मोदी आणि शाह यांनी सत्यात उतरवले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. धर्माचे राजकारण आणि व्होट बँकेचे राजकारण घटना रोखू शकत नाही. देशाचा आजचा गोंधळ सावरण्यास घटना अपुरी पडत आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut, Narendra Modi
Supriya Sule: सुप्रिया सुळे ठरल्या नंबर वन खासदार!

‘रोखठोक’ आसूड जसेच्या तसे…

या देशात नवे हिंदुत्वाचे वातावरण तयार करण्यात आले आहे. त्यातून दोन खोमेनी निर्माण झाले आहेत. त्यातूनच आता असंख्या खोमेनी निर्माण करून देश इराण, सीरिया आणि अफगाणिस्तानच्या पद्धतीने चालवला जाईल.

संसदीय लोकशाहीच्या मुखवट्याखाली हुकूमशाही चालते आणि हुकूमशहा हवा म्हणून हिंदुत्वाचे कार्ड चालवले जाते. सामान्य मतदारांनी विचार करण्याचा हा काळ आहे. आपण सार्वभौम आहोत. इतका गैरसमज जरी सध्या दूर झाला तरी पुरे आहे.

राजकीय पक्षांना टिकू द्यायचे नाही. सर्व सत्ता दोघांकडे असावी हा विचार म्हणजे घोटाळा आहे. देशात गवतासारख्या वाढणाऱ्या आणि फुटणाऱ्या राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या तावडीतून देशाला सोडवण्याची गरज असताना पंतप्रधान फोडाफोडीस उत्तेजन देत आहे.

सरकारला अडचणीचे ठरणारे निर्णय सुप्रीम कोर्ट घेत नाही. तारखांची शर्यत सुरूच ठेवते. मुंबईसह 14 महापालिकांच्या निडवणुका रोखण्याचे कारण नव्हते. कोर्ट निवडणुका घेऊ देत नाही. हे सरकारला आणि भाजपला हवेच आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर गेली 15 वर्ष तारखांशिवाय काहीच घडत नाही. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरचा निर्णय अधांतरी आहे. सर्व काही घटनेनुसार होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com