संजय राऊतांचा नारायण राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल

संजय राऊतांचा नारायण राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल

संजय राऊतांचा नारायण राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

संजय राऊतांचा नारायण राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. मुलुंड कोर्टात राऊतांनी हा दावा केला आहे. फेब्रुवारी महिन्यात नारायण राणे यांनी संजय राऊतांवर एक विधान केलं होतं की, राज्यसभेवर निवडून आणण्यासाठी संजय राऊतांसाठी मी पैसे खर्च केलं. त्यांचे मतदार यादीतसुद्धा नाव नव्हते.

या विधानानंतर संजय राऊत यांनी नारायण राणेंना रितसर नोटीस पाठवली होती की, विधानाविषयीची माहिती पुराव्यासहित सादर करा. मात्र नारायण राणेंकडून त्या नोटीसीला उत्तर मिळाले नाही. यामुळे आता मुलंड कोर्टामध्ये अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com