संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकपाठोपाठ ठाण्यातही गुन्हा दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातून शिंदें गटात गेलेले शिवसैनिक योगेश बेलदार यांनी संजय राऊतांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
संजय राऊतांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांचा समाचार घेतला. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांविरोधात अपशब्द वापरले.अशातच नशिकमध्येही ठाकरे आणि शिंदे गट यातील संघर्ष वाढला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्यावर दाखल करण्यात आलेला पहिलाच हा गुन्हा आहे. अमित शाहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.
याचसोबत आता संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकपाठोपाठ आता ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकचे शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कलम 500 नुसार संजय राऊत यांच्या विरोधात बदनामी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.