संजय राऊत यांना दिलासा नाही, कोठडी पुन्हा वाढली

संजय राऊत यांना दिलासा नाही, कोठडी पुन्हा वाढली

न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर संजय राऊत यांच्या कोठडीची सुनावणी झाली.
Published by :
Team Lokshahi
Published on

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने धाड टाकून त्यांना अटक करण्यात आली. त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीने कोठडी सुनावली. ही कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. परंतु त्यांना दिलासा मिळाला नाही.

न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर संजय राऊत यांच्या कोठडीची सुनावणी झाली. ईडीने त्यांच्या कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी केली. या सुनावणीत संजय राऊत यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

काय आहे प्रकरण

पत्राचाळेत म्हाडाचा भुखंड होता. हा भुखंड विकसित करण्यासाठी आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम दिले होते. पण त्यांनी ही जागा परस्पर खाजगी विकासकांना विकली. पत्राचाळमधील 672 रहिवाशींना 650 स्केअर फुटाचे घर देण्यात येणार होते. त्यांच्या या सोसायटीत अनेक अॅनिमिटी देण्यात येणार होत्या. रहिवाशांना 25 कोटी रुपये कार्पस फंड देण्यात येणार होते. त्यातून रहिवाश्यांचे मासिक मेंटेनेंस भरला जाणार होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com