आमदार राहुल कुल यांच्यावर संजय राऊतांनी केला मनी लाँड्रींगचा आरोप; कोण आहेत राहुल कुल?
कोल्हापुरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसते.500 कोटीचा mony laundring व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्या कडून अपेक्षा आहे. असे म्हणत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
राऊत यांनी आरोप केलेले राहुल कुल कोण आहेत?
राहुल कुल हे पुण्यातल्या दौंड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार आहेत. याच्याआधी ते राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार होते. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या कांचन कुल यांच्या आत्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.
2009 मध्ये राहुल कुल यांनाच पक्षाने संधी दिली. निवडणुकीत बंडखोर उमेदवाराला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचा आरोप करत कुल यांनी राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली.
राहुल कुल यांचा एक व्हिडिओ मध्यंतरी चांगलाच चर्चेत आला होता. तो म्हणजे जेजुरीच्या दर्शनाला गेल्यानंतर त्यांनी पत्नीला उचलून पाच पायऱ्या चढल्या होत्या. हा व्हिडिओ त्यांचा चांगलात व्हायरल झाला होता.
संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस जारी करण्यात आली आहे. यासाठी हक्कभंग समिती नेमण्यात आली आहे. विधिमंडळातील या हक्कभंग समितीचे अध्यक्ष आमदार राहुल कुल आहेत.