Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड

Sanjay Raut : अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी; 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड

अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी. मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीच्या खटला दाखल केला होता. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सोमय्या कुटुंबाने स्वछतागृह बांधण्यात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील टॉयलेट घोटाळ्यात झालेल्या आरोपांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी मानहानीची तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवरून महानगर दंडाधिकारी माझगाव यांनी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना १५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

2022 सालचे हे प्रकरण असून यावर आता शिवडी कोर्टाने निकाल दिला आहे. मानहानीच्या आरोपाखाली राऊत यांना आयपीसी कलम ५०० नुसार दोषी ठरवण्यात आले आहे. मेधा सोमय्या यांनी शिवडी कोर्टात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निकाल दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com