Sangli : सांगलीतील चांदोली धरणक्षेत्रात पावसाची संततधार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Sangli : सांगलीतील चांदोली धरणक्षेत्रात पावसाची संततधार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

सांगलीतील चांदोली धरणक्षेत्रात पावसाची संततधार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

संजय देसाई, सांगली

सांगलीतील चांदोली धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात 29.65 टीएमसी पाणी साठा झाला आहे.

पाण्याची आवक कायम असल्याने धरण प्रशासनाकडून वारणा नदी पात्रामध्ये 11 हजार 532 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. जोरदार पावसामुळे चांदोली धरण 86 टक्के भरलं आहे.

याच पार्श्वभूमीवर धरणातून वारणा नदीत 11 हजार 532 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com