सांगली अल्पवयीन मुलाने चार चाकी चालवून पोलीस बॅरिकेटिंग तोडले, सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी
संजय देसाई, सांगली; सांगली मिरज कुपवाड रोड गांधी चौक जवळ अल्पवयीन मुलाने चार चाकी गाडी भरधाव वेगाने चालवून पोलीस बॅरिकेटिंगच उडवले यात मिरज वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे जखमी झाले आहेत. सदरचा प्रकार मध्यरात्री घडला आहे.
एक चार चाकी मारुती ईरटीका वाहन भरधाव वेगात सांगलीहून मिरजेला येत असल्याची माहिती सांगली पोलिसांनी मिरज पोलिसांना दिली सदरची खबर समजताच मिरज शहर पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि मिरज शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे पोलिसांसमवेत कुपवाड रोड गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी केली. सदरचा गाडीचा पाठलाग सांगली शहर पोलिसांची गाडी सुद्धा करत होती. पोलिसांनी थांबण्याचा इशारा करून सुद्धा सदरची गाडी भरधाव वेगात मिरजेच्या दिशेने सुटली होती. मिरज शहर पोलिसांनी बॅरिकेटिंग लावून सदर गाडी अडविण्याचा प्रयत्न केला परंतु भरधाव वेगात असलेल्या ईरटीका गाडीने पोलीस बॅरिकेटिंग उडविल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे जखमी झाले गाडी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु सदरची गाडी भरधाव वेगात निघून गेली
गाडीच्या नंबर वरून पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला व सदरची गाडी अल्पवयीन तरुण चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी सदरची गाडी आपल्या ताब्यात घेतली असून याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशीब बलवत्तर म्हणून सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्यासह पोलीस कर्मचारी बचावले सदरच्या अल्पवयीन मुलांचे आई-वडील हे परदेशात असतात अल्पवयीन मुलांना अशा चार चाकी गाड्या देऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार समोर उघडकीस आला आहे.