"वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो";दसरा मेळाव्यावरून मनसेचा शिवसेना आणि शिंदे गटाला टोला!

यंदाचा दसरा मेळावा नेमका कुणाचा होणार? यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे दरवर्षी शिवसेना पक्षप्रमुखांचं होणारं हे महत्वाचे असते. यंदा मात्र नेमकी शिवसेना कोणती? हाच प्रश्न उपस्थित केला जात असताना दसरा मेळावा कोण घेणार? आणि त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाषण कोण करणार? या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. राज्यात एकीकडे शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालय नेमका काय निकाल देणार, याची उत्सुकता असताना दुसरीकडे दसरा मेळाव्यावरून राजकारण सुरु असलेले आपल्याला पाहायला मिळते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

या सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या भाषणादरम्यान “माझ्याकडे चिन्ह असलं किंवा नसलं, नाव असलं किंवा नसलं, त्याने फरक पडत नाही. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे”, असं म्हटलं होतं. यासोबतच राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषण करावं, अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत, अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी सांगितली.

तसेच आता यावरुन आता मनसेकडून ही भूमिका सातत्याने मांडली जात आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये याच मुद्द्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांना लक्ष्य केलं आहे. “‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो”, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

"वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो";दसरा मेळाव्यावरून मनसेचा शिवसेना आणि शिंदे गटाला टोला!
अर्थव्यवस्थाही दमली आणि खणखणीत असलेला रुपयादेखील खंगला; सामनातून हल्लाबोल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com