पंतप्रधान नरेंद्र मोदी आपलेच आहेत. ते कधीही येतील. पण गुंतवणूक येणार नाही - संजय राऊत
येत्या 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महानगरपालिकेच्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट तसेच इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत. येत्या 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई महानगरपालिकेच्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट तसेच इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येणार आहेत. या दौऱ्यात मेट्रो २-ए आणि मेट्रो ७ चे उद्घाटनदेखील करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं जाईल. मोदी यांच्या हातून आणखी एक मोठं उद्घाटन होणार आहे. मुंबईतल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण. यासह बाळासाहेब ठाकरे आपका दवाखाना योजनेअंतर्गत ५२ दवाखान्यांचं उद्घाटनही मोदींच्या हस्ते केलं जाईल.
याच पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्यावरुन संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान एका दिवसासाठी, काही तासासाठी येत आहेत. पंतप्रधानांची तारीख बदलता आली असती. पण यांना गुंतवणुकीपेक्षा पंतप्रधानांचे राजकीय कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. महापालिका निवडणूक, शिवसेनेला त्रास देणं महत्त्वाचं आहे. त्यांना गुंतवणुकीचं काही पडलं नाही. असे राऊत म्हणाले.
यासोबतच गुंतवणुकीबाबत या सरकारला काही घेणंदेणं नाही. पंतप्रधान येत आहे, त्यांचं स्वागत आहे. राज्याचे मंत्री दावोसला जात आहे. गुजरातचे नेतेही जात आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचा मुंबईतील नियोजित कार्यक्रम रद्द केला पाहिजे. ते पालिका निवडणुकीसाठी येत आहे. पंतप्रधान चांगले आहेत. त्यांना विनंती करा. ते पुढची तारीख देतील. पण दावोसची तारीख मिळणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा निव्वळ राजकीय असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. असे म्हणत राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.