Sameer Wankhede
Sameer WankhedeTeam Lokshahi

Sameer Wankhede यांची पुन्हा बदली; आता थेट चेन्नईमध्ये होणार रुजू

आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडेंवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई | केदार शिंत्रे : एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आलेली आहे. समीर वानखेडे यांची चेन्नई ला बदली डायरेक्टर जनरल टॅक्स पेयर सर्व्हिस पदावर बदली झाली आहे. सध्या समीर वानखेडे Directorate of Revenue Intelligence खात्यात कार्यरत होते. आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आर्यन खान हा निर्दोेष होता, मात्र त्याला गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसंच तपासात मोठ्या चुका असल्याचं निरीक्षण एनसीबीच्या एसआयटीनं नोंदवलं आहे. त्यामुळे तत्कालीन तपास अधिकारी म्हणून वानखेडे यांच्यावर कारवाईची शक्यता बळावली होती. मात्र आता अचानक त्यांची बदली झाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

Sameer Wankhede
Narayan Rane : नारायण राणेंच्या अडचणीत वाढ, CRZ कायदाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस

मुंबईतील कॉर्डीलिया क्रूझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर केलेल्या कारवाईनंतर समीर वानखेडे प्रचंड चर्चेत आले होते. मात्र त्यानंतर नवाब मलिकांनी त्यांच्याबद्दल केलेल्या काही आरोपांमुळे, पंचांनी केलेल्या खुलाशांमुळे आणि या प्रकरणात समोर आलेल्या वेगवेगळ्या चक्रावणाऱ्या गोष्टींमुळे समीर वानखेडेंवर संशय व्यक्त केला जात होता. वानखेडेंनी पैशांसाठी आर्यनला गोवण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. विशेष म्हणजे या पार्टीवर छापा टाकला तेव्हा जे पंच समीर वानखेडेंनी सोबत नेले होते, त्यांनीच समीर वानखेडेंवर काही गंभीर आरोप केले. ज्यानुसार वानखेडेंनी कोऱ्या कागदांवर साक्षीदारांच्या सह्या घेतल्याचं सांगण्यात आलं होतं.

नवाब मलिकांच्या कार्यालयाकडून करण्यात आले होते सवाल...

महाविकास आघाडी सरकारचे तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणात समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले होते. नवाब मलिक तुरुंगात आहेत, मात्र आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्यानंतर नवाब मलिकांच्या कार्यालयाकडून एक ट्विट करण्यात आलं. या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "आता या प्रकरणात आता आर्यन खान आणि इतर 5 जणांना क्लीन चिट मिळाली आहे. NCB आता समीर वानखेडे यांच्या टीमवर आणि खाजगी सैन्यावर कारवाई करेल का? की गुन्हेगारांना संरक्षण देणार?" असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता समीर वानखेडे यांची अशावेळी बदली का करण्यात आली हा सवाल देखील उपस्थित केला जातोय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com