ठाकरे गटाचं मशाल चिन्हही काढून घ्या; निवडणूक आयोगात 'या' व्यक्तीने दिलं निवेदन?
निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांना विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? यावर शिंदे-ठाकरे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 17 जानेवारी रोजी निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाकडून युक्तिवाद झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाचे दावे फेटाळून लावले होते. यावेळी 23 जानेवारीला दोन्ही गटांना लेखी स्वरुपात उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिला होते. यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत धनुष्यबाण व शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे.
त्यानंतर आता त्यांना मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिलेलं मशाल हे निवडणूक चिन्ह काढून घ्यावं, अशी मागणी समता पक्षाकडून करण्यात आली आहे. समता पक्षाचे अध्यक्ष उदय मण्डल यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे.
याचे निवेदन कैलाश कुमार नामक व्यक्तीने निवडणूक आयोगाकडे दिलं आहे. आज दुपारपर्यंत समता पक्षाचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे.