उद्धव ठाकरेंच्या अडचणी अजून वाढल्या; पक्षचिन्ह गोठवल्यानंतर आता मशाली'वरुन समता पक्ष आक्रमक

उद्धव ठाकरेंच्या अडचणी अजून वाढल्या; पक्षचिन्ह गोठवल्यानंतर आता मशाली'वरुन समता पक्ष आक्रमक

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले. हा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का मानण्यात येत आहे. यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. शिवसेना नावासह धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले. मात्र, आता ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे असणारे मशाल चिन्ह सुद्धा आता जाणार असल्याची चर्चा आहे.

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे. निवडणूक आयोगाने अगोदर मशाल हे चिन्ह समता पार्टीला दिलं होतं. यावरुन आता समता पार्टी चांगलीच आक्रमक झाली आहे.

समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मशालची लढाई ही आमची स्वत:ची लढाई आहे. एकनाथ शिंदे यांना जे हवं होतं, ते त्यांना मिळालं. आता आम्हाला जे पाहिजे ते मिळवण्याचा प्रयत्न आमचा आहे. ‘मशाल’ पक्षचिन्हासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे मंडल यांनी सांगितले. असे समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com