Sadabhau Khot - Ajit Pawar
Sadabhau Khot - Ajit PawarTeam Lokshahi

"पवार कंपनीनं राज्याचं वाटोळं केलंय, आता राज्याला वाचवण्याची वेळ"

शरद पवारांना मागितलेल्या हर्बल गांजाचं बियाणं त्यांनी अजून पाठवलं नसल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले.
Published by :
Sudhir Kakde
Published on

शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) निशाणा साधला. जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा हे अभियान आम्ही सुरू केलंय. कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना संपत नाहीये. सरकारी तिजोरीवर सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. हा दराडो लपविण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय काढत आहे असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.

Sadabhau Khot - Ajit Pawar
राणा दाम्पत्यांचा जामीन रद्द होणार? माध्यमांशी बोलून केलं अटींचं उल्लंघन

शेतकऱ्यांच्या मुद्दयावर बोलताना पुढे सदाभाऊ खोत म्हणाले की, पीक विमा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अद्याप मिळाले नाही. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यावर 10 हजार भरणार हे आश्वासन देण्यात आलं होतं.10 हजार सोडा, आता शेतकऱ्यांचे वीज आता सरकार कट करत आहे. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असं अजित पवारांनी सांगितलं होतं. नाही दिले तर आम्ही पवार यांचे अवलाद मानणार नाही असं म्हणाले होते. मग आता तुम्ही कुणाचे अवलाद आहे हे पवार साहेबांनी सांगावं असा सवाल सदाभाऊंनी केला.

शरद पवार यांच्यावरही घणाघात

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, सरकार सध्या बारामती वरून चालतंय. मराठा आरक्षण देखील बारामतीकरांनी घालवलं आहे. मराठा समजाचं वाटोळ या बारामतीकरानी केलंय. राज्याचं वाटोळं या पवार अँड पवार कंपनीने केलंय. राज्याला आता पवार यांच्यापासून वाचवण्याची वेळ आली आहे. हर्बल गांजा देण्यासाठी मी शरद पवार यांना पत्र लिहून देखील मला अजून मिळाले नाही. पवार यांच्याकडे हर्बल गांजा फक्त नवाब मलिक यांच्यासाठी आहे का? आम्हाला पण ते गांजाचा बियाणं द्यावं. आम्ही शेतकऱ्यांना देऊन पेरणी करू पण आम्हाला अजून मिळालं नाही असा खोचक टोला शरद पवारांनी लगावला आहे.

Sadabhau Khot - Ajit Pawar
"PM नरेंद्र मोदी हिटरलचे फॉलोअर, त्याप्रमाणेच ते..."; संजय राऊतांचा घणाघात

सरकार कष्टकरी वर्गाची चेष्टा करत आहे. दूध, कांदा प्रश्न गंभीर झाला आहे. कांद्याला 5 रुपये वाहतूक अनुदान सरकारने तातडीने दिलं पाहिजे. याकडे सरकार लक्ष देत नाहीये. सरकार विरोधात जो बोलेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा काम सुरू आहे. सत्तेत असताना तुम्ही तुडवा, गाडा असे शब्द वापरता तुम्ही काय औरंगजेबाच्या अवलादी आहात का? असं म्हणत संजय राऊत यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. एकुणच या सर्व प्रश्नांवर आम्ही ही जागर यात्रा सुरू केली आहे. येत्या 18 तारखेला सोलापूर जिल्ह्यातील माढा मध्ये होणार आहे असं सदाभाऊ खोत यांनी जाहीर केलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com