तर मग नव्या संसदेचा महाल काय कामाचा? सामनातून सवाल
पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. अनेक विरोधी पक्षांनी या उद्घाटन कार्यक्रमाला विरोध करत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. तामिळनाडूच्या अध्यानम संतांनी संपूर्ण विधीपूर्वक विधी पार पाडला. पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते. धार्मिक विधीनंतर अधिनस्थ संतांनी सेंगोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केले, जे नवीन संसद भवनात स्थापित करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल करण्यात आले आहे. सामनातून म्हटले आहे की, नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन भव्य स्वरूपात पार पडले. हा सोहळा म्हणजे 'सब कुछ मोदी आणि फक्त मोदी' असाच होता. फोटो आणि इतर चित्रीकरणात दुसऱ्या कुणाची सावलीही मोदी यांनी येऊ दिली नाही. मोदींचा तो स्वभाव आहे. असे म्हटले आहे.
तसेच पंडित नेहरूंच्या काळात लोकसभेचं कामकाज वर्षातून किमान 140 दिवस चालायचं. आता ते 50 दिवसही चालत नाही. त्या महालात सरकारला धारदार प्रश्न विचारण्याची मुभा नसेल तर ' सत्यमेव जयते ' चा बोर्ड खाली उतरवा . त्या महालात राष्ट्रीय प्रश्नांवर गर्जना करण्यापासून रोखणार असाल तर संसदेच्या घुमटावरील तीन सिंहांचे भारतीय प्रतीक झाकून ठेवा. असे म्हटले आहे.
यासोबतच एक हजार कोटींचा 'महाल' लहरी राजाच्या इच्छेखातर बनवण्यात आला व त्यातून लोकशाहीच हद्दपार झाली अशी नोंद इतिहासात होईल. दिल्लीत मोदींचे राज्य आल्यापासून संसदेचे कामकाज जवळ जवळ बंदच असते. पंडित नेहरूंच्या काळात वर्षाला 140 दिवस किमान लोकसभेचे कामकाज चालत असे. आता ते 50 दिवसही चालत नाही. मग न चालवल्या जाणाऱ्या संसदेसाठी एक हजार कोटींचा भव्य संसद महाल कशासाठी? असे सामनातून विचारण्यात आले आहे.