'आपला हा देखावा कशासाठी?'  बोपदेव घाटात पाहणीवरुन चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला

'आपला हा देखावा कशासाठी?' बोपदेव घाटात पाहणीवरुन चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला

पुण्याजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात एका 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती, अद्याप या घटनेतील आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत
Published by :
shweta walge
Published on

पुण्याजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात एका 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती, अद्याप या घटनेतील आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. बुधवारी सुप्रिया सुळेंसह शरद पवारांकडून बोपदेव घाटात पाहणी केली. बोपदेव घाटातील पाहणीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. आपला हा देखावा कशासाठी? असा प्रश्न विचारत टीका केली आहे. पोलीस यंत्रणा आरोपींना शोधण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत असल्याच म्हणाले.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, सुप्रिया सुळे यांनी काल बोपदेव घाटातील मुलीवर झालेल्या अत्याचार घटनास्थळाला भेट देत इव्हेंट केला आणि आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केल्या. पोलीस यंत्रणा आरोपींना शोधण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहेत. चंद्रपूर मधील युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला हे सुप्रिया सुळेंना सांगू इच्छिते त्याने अजूनही काही मुलींवर अत्याचार केल्याचं माहिती कळते.

तुतारी गटाचा सोशल मीडियाचा पदाधिकारी याच्यावर अत्याचाराची गुन्हे दाखल आहेत तरीसुद्धा अशा आरोपीला प्रदेश सरचिटणीस पद दिला आहे.

स्वतःच्या पक्षात असलेल्यांच्या विरोधात पत्रकार परिषद कधी घेणार आणि कधी आंदोलन करणार सुप्रिया सुळे, झोपी गेलेल्या माणसाला जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला नाही.

माविआ सरकार काळात गृहमंत्री असणाऱ्या अनिल देशमुख यांच्याकडे मी अत्याचाराबाबत फाईल घेऊन गेले होते मात्र त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं , माव्या आणि महायुती काळात घडलेल्या अत्याचाराच्या घटना सारख्याच आहेत मात्र त्याचा आम्ही कधी राजकारण केलं नाही.

सुप्रिया सुळे पुण्याची बदनामी करता येत हे पुणेकरांना आवडणार नाही, त्यामुळे त्यांच्या सरकारच्या काळात घडलेल्या घटनांचा अहवाल त्यांना पाठवत आहे, असं त्या म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com