Rule Change From 1st September 2023 : देशात आजपासून 'हे' मोठे बदल; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

Rule Change From 1st September 2023 : देशात आजपासून 'हे' मोठे बदल; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

आज 1 सप्टेंबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज 1 सप्टेंबरपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही महत्त्वाचं काम असेल तर, आधीच पूर्ण करुन घ्या. कारण संपूर्ण महिन्याभरात तब्बल 16 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. UIDAI नं आधार अपडेटची सुविधा मोफत दिली आहे. त्याची मुदत 14 सप्टेंबर रोजी संपत आहे. आधार कार्ड मोफत अपडेट करायचं असेल तर तुमच्याकडे ते अपडेट करण्याची शेवटची संधी आहे.

केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडरच्या किमतीत दिलासा दिला आहे. सरकारने 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी केली आहे.1 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर येणार्‍या सर्व IPO साठी लिस्टिंगच्या वेळेचे नवीन नियम स्वेच्छेने लागू केले जातील. तसेच, 1 डिसेंबर 2023 पासून, कंपन्यांना नियमांचं पालन अनिवार्यपणे करावं लागेल. असे SEBI ने अधिसूचनेत म्हटले आहे.

सप्टेंबर एक तारखेपासून या क्रेडीट कार्डाच्या अटी आणि शर्तींमध्ये मोठे बदल होऊ शकतात. 1 सप्टेंबरपासून नवीन कार्डधारकांना वार्षिक शुल्कही भरावं लागणार आहे. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com