चीन, जपानमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR चाचणी बंधनकारक
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीन, ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 76 हजार 199 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
भारताचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय हे रोज आढावा बैठक घेत आहेत त्याचप्रमाणे आरोग्य तज्ज्ञांशी चर्चाही करत आहेत. अशात मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. चीन, जपानसह काही महत्त्वाच्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी बंधनकारक असणार आहे असं मनसुख मांडवीया यांनी सांगितले.
चीन, जपान या देशांमध्ये करोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट मोडवर आहे.नव्या वर्षाच्या स्वागताचा उत्साह लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. तो लक्षात घेऊन टेस्ट- ट्रॅक-ट्रीट आणि व्हॅक्सिनेशन यावर भर द्या अशी महत्त्वाची सूचना दिली आहे.चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलँड या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी सक्तीची असणार आहे. ज्या प्रवाशाला लक्षणं आढळतील किंवा ज्या प्रवाशाची चाचणी पॉझिटिव्ह येईल त्या प्रवाशाला क्वारंटाईन करण्यात येईल. AIR Suvidha हा फॉर्मही चीन, जपान, साऊथ कोरिया, हाँगकाँग आणि थायलँडवरून येणाऱ्या प्रवाशांना भरणं सक्तीचं असणार आहे. यामध्ये त्यांना आपल्या प्रकृतीची सद्यस्थिती नमूद करावी लागणार आहे.