राज्यात दुधाच्या दरात 2 रुपयांची घट; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...
राज्यात दुधाच्या दरात 2 रुपयांची घट करण्यात आली आहे. गायीच्या दूध खरेदी दरात 2 रुपयांची घट केली गेली आहे. दुधाचे दर प्रतिलीटर 29 वरून 27 रुपयांवर करण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शेतमालाला भाव नसल्याने अगोदरच अडचणीत असलेले शेतकरी आता दूधाच्या दरात घट झाल्यामुळे आणखी अडचणीत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतमालाला भाव नसल्यामुळे हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांना दूधापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आधार होता. पण हे दर देखील कमी झाले आहेत.
यासोबतच त्या पुढे म्हणाले की, दुसरीकडे पशुखाद्य, चारा यांचे दर अतिशय वाढलेले असून दूधाच्या कमी झालेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहेत. हे लक्षात घेता माझी शासनाला विनंती आहे की, दूधाचे दर पुर्ववत करण्याच्या दृष्टीने सात दिवसांच्या आत शासनाने पावले उचलावी. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.