IPL 2024
IPL 2024

"मुंबई इंडियन्समधून रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि ईशानला बाहेर काढा"; माजी दिग्गज फलंदाजाची खळबळजनक प्रतिक्रिया

आयपीएल २०२४ च्या आधी स्टार फलंदाज रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवलं होतं. त्याच्या जागेवर हार्दिक पंड्याला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केलं होतं.
Published by :
Naresh Shende
Published on

Virender Sehwag On Mumbai Indians : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने मुंबई इंडियन्सच्या आयपीएल २०२४ मधील खराब कामगिरीवर खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. सेहवाग म्हणाला, मुंबई इंडियन्सने त्यांच्या मोठ्या खेळाडूंना रिलीज केलं पाहिजे. संघात दिग्गज खेळाडूंचा समावेश असणं, याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही ट्रॉफी जिंकणारच. माध्यमांशी संवाद साधताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान एकाच चित्रपटात असतील, तर तो चित्रपट हिट होईलच, याची गॅरंटी आहे का? यासाठी तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला एक चांगल्या स्क्रिप्टची गरज आहे.

रोहित शर्माने एक शतक ठोकलं आणि मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. बाकी सामन्यांमध्ये रोहितची कामगिरी कशी राहिली? ईशान किशनने संपूर्ण सीजन खेळला, पण तो पॉवर प्लेच्या पुढे जाऊ शकला नाही. संघासाठी फक्त जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादवने अप्रतिम कामगिरी केली. या दोन खेळाडूंशिवाय इतर खेळाडूंना रिटेन करण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही. कोणत्या विदेशी खेळाडूलाही रिटेन केलं नाही पाहिजे, असंही वीरेंद्र सेहवागनं म्हटलं आहे.

आयपीएल २०२४ च्या आधी स्टार फलंदाज रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवलं होतं. त्याच्या जागेवर हार्दिक पंड्याला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केलं होतं. पंड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी झालीय. मुंबईचा संघ आयपीएल २०२४ मधून बाहेर पडणारा पहिला संघ आहे. मुंबईचा १३ पैकी ४ सामन्यांमध्ये विजय तर ९ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात खालच्या स्थानी आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com