पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांची भेट
पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. नवी पेठ शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. कृषीसेवेच्या 258 पदांचा एमपीएसीत समावेश करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची असून या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यासोबतच MPSC, IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्यानं परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांनी भेट दिली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, साडे दहापर्यंत निर्णय जाहीर करावा. या विद्यार्थ्यांना अभ्यास देखिल करायचा आहे. पण जाहीर करत असताना विद्यार्थ्यांच्या मागणीअनुसारच होणं महत्वाचे आहे. मुलांचे जे म्हणणं आहे ते रास्त आहे. त्यामुळे योग्य निर्णय घेणं जरुरी आहे.
पवार साहेबांनी काल ट्विट केलं आहे की, सरकारने मुलांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे. दुर्लक्ष केलं तर ते स्वत: संध्याकाळी येतील. जर साहेब इथं आलं तर मग एकतर या सरकारला ते परवडणार नाही. आमच्या सगळ्यांनी मागणी आहे यात राजकारण नको. साडे दहापर्यंत निर्णय देऊन टाका मग ही मुलं अभ्यासाला निघून जातील. असं रोहित पवार म्हणाले.