Rohit Pawar : आम्हाला विश्वास आहे की, महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होणार असून संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणी होणार आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधान परिषदेत महायुती की महाविकास आघाडी कोणाला पराभव स्विकारावा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
रोहित पवार म्हणाले की, घोडेबाजार करण्याचा प्रयत्न काहीप्रमाणात महायुतीकडून नक्कीच चालू आहे. पण आम्हाला विश्वास आहे महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांवर असं कितीही काही प्रयत्न, कितीही काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न महायुतीकडून झाला तरी विचाराला पक्के असणारे महाविकास आघाडीचं लोक जे आमदार आहेत ते आपले सर्व उमेदवार कसं निवडून येतील यासाठी प्रयत्न करतील आणि संध्याकाळचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने असेल.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, जेव्हा महायुती अशा पद्धतीने राजकीय पुड्या जर बाहेर सोडत असेल त्याच्यावरुन काही प्रमाणात आपल्याला असं समजावं लागेल की जे महायुतीचे सर्व नेते आहेत ते किती लेव्हवला जाऊ शकतात. बघूया काय होते. नक्कीच कुठे ना कुठेतरी काही लोक हे आमिषाला आहारी जाऊ शकतात. पण आम्हाला विश्वास आहे की, महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील. असे रोहित पवार म्हणाले.