Rohit Pawar : दोन दिवसांपासून रस्त्यावर असलेल्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन इतकं तीव्र होईल की मग सरकारला हातातला घास तोंडात घालणंही कठीण होईल
पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. नवी पेठ शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. कृषीसेवेच्या 258 पदांचा एमपीएसीत समावेश करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची असून या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यासोबतच MPSC, IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्यानं परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, सरकारमधील मंत्री आणि अधिकारी यांचा morning walk, अंघोळ, चहा-नाश्ता झाला असेलच... त्यामुळं आता तातडीने विद्यार्थ्यांची मागणी मान्य करणारं #notification काढावं...
यासोबतच ते पुढे म्हणाले की, अन्यथा दोन दिवसांपासून रस्त्यावर असलेल्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन इतकं तीव्र होईल की मग सरकारला हातातला घास तोंडात घालणंही कठीण होईल. असे रोहित पवार म्हणाले.