'निवडणुकीत आर्थिक मदतीची गरज' राम शिंदे यांचं नागरिकांना आवाहन; रोहित पवारांची टीका
थोडक्यात
भाजपाचे विधानपरिषद आमदार राम शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत नागरिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
शिंदे यांच्या आवाहनानंतर सोशल मीडियावर त्यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि आमदार रोहित पवारांनी शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजपाचे विधानपरिषद आमदार तथा माजी मंत्री आणि कर्जत जामखेडचे उमेदवार राम शिंदे यांनी x पोस्ट करत विधानसभा निवडणुकीत नागरिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. शिंदे यांच्या अवाहानानंतर सोशल मीडियावर शिंदे यांना चांगलेच ट्रोल आहेत. राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार तथा आमदार रोहित पवारांनी देखील शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, भाजपाने शिंदे यांना मोठा निधी दिलेला आहे एवढेच नव्हे तर अर्ज दाखल करतांना त्यांनी एफेडेविड वर 8 ते 10 कोटी रुपयाची मालमत्ता जाहीर केलेली आहे. असं असतांना हे आवाहन लोकांना भावनिक करण्यासाठी करण्यात आला असला तरी लोक त्यांच्यावर हसताहेत त्यांनी आता नेत्यांना विकत घेणे दारू वाटणे सुरु केलेले असतांना हे आवाहन हास्यस्पद असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे.